Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

परत दे मला पावसाळा तुझा Gazalkar Gautam Raut

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



परत दे मला पावसाळा तुझा


नको जीवघेणा उन्हाळा तुझा

परत दे मला पावसाळा तुझा


कशी काच माझ्या मनाची पुसू

उडे आठवांचा धुराळा तुझा..


परीपूर्ण मी समजु शकलो कुठे

मला चेहराही नव्हाळा तुझा


मला छान वाटायचा सावळा..

कसा रंग झाला गव्हाळा तुझा


तळाशी मला जायला पाहिजे..

किती खोल आहे जिव्हाळा तुझा


फुले जाहलो मीच वेणीतले..

बटांशी सुरू आज चाळा तुझा


नको सारखे दूर जाऊ सखे..

उरी दाटतो ना उमाळा तुझा


गौतम राऊत


 गझलकार गौतमजी राऊत यांना वाढदिवसाच्या 

हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments