Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मी जगणे फुलवत गेले Gazalkara Vaishali Mali

 • गझल प्रभात •   

🌹वाढदिवस विशेष 🌹



 🌹मी जगणे फुलवत गेले🌹


ऋतू असू दे कुठलाही मी जगणे फुलवत गेले

बदलत गेला काळ तशा मी सवयी बदलत गेले


छोटे छोटे सुंदर क्षणही वेचू शकले माझे

योग्य क्षणी मी डोळ्यांमधली वर्दळ हटवत गेले


सहज तुडवले जाऊ शकतो इतके कळल्यानंतर

काटे माझ्या वाटेतुन बाजूला सरकत गेले


तुझ्याबरोबर वेड्यागत बेभान बरसले होते

तुझ्याविना हे जगणे निव्वळ धुरळा उडवत गेले


मौन विव्हळले दोघांमधले इतके आकांताने

काय एवढे दोघांच्याही आतुन ठणकत गेले


या हातांना 'आनंदाचे हात' म्हणाली आई

हुबेहूब मी हात मुलीचे असेच घडवत गेले


इतक्यासाठी शांतपणाने झोपू शकले कायम

दिवस चांगला गेल्याचे रात्रीला कळवत गेले


वैशाली माळी


 गझलकारा वैशालीजी माळी यांना वाढदिवसाच्या 

हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments