● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌹मी उन्हाळ्याचे कारण दिले🌹
मी उन्हाला खास आमंत्रण दिले
सावलीला आणि आरक्षण दिले
आस मी धरली नि स्वप्ने पाहिली
वेदनांना मी नव्या आंदण दिले
बातमी उध्वस्ततेची वाचण्या
मी मनाचे काढुनी कात्रण दिले
वेदना हलकी नि झाले श्वास जड
साजरे करण्या स्वतःला व्रण दिले
घेतले त्याला मिठीमध्ये जरा
पावसाला छानसे कोंदण दिले.
टांगुनी मी चंद्र तारे ठेवले
आणि खिडकीला नवे तोरण दिले
पाहुनी आकाश सारे कोरडे
त्यास मी माझ्यातले श्रावण दिले
पोचली जेव्हा नजर त्या अंबरी
उंबऱ्याचे मी त्वरित कुंपण दिले
तू अशी सुकलीस का? आई म्हणे
मी उन्हाळ्याचे तिला कारण दिले
प्राजक्ता पटवर्धन
गझलकारा प्राजक्ता पटवर्धन यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा... 🌹🌹🌹
--------------------------------------
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
--------------------------------------

0 Comments