• गझल प्रभात •
🌹 रोज डे विशेष 🌹
🌹क्षण गुलाबी 🌹
तू दिलेले क्षण गुलाबी आजही ठेवेन कायम
त्या गुलाबी पाकळ्यांची जाणही ठेवेन कायम..
थांबलेला काळ होता, मोकळा अवकाश होता
पण दिशांच्या सोबतीचे भानही ठेवेन कायम..
शब्द सारे संपल्यावर शांततेचा सूर जपला
सावळ्या ओठांवरी या स्मितही ठेवेन कायम..
वासनेच्या तळ उराशी भावनांची लाट आहे
त्या उसळत्या सागराचे मानही ठेवेन कायम..
चांदण्यांचे स्वप्न पडले की खरे होते कदाचित
मग उद्याच्या भेटण्याची आसही ठेवेन कायम..
सौ. दिपाली महेश वझे
बेंगळूरू
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments