● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌹 पुन्हा नव्याने 🌹
आकाश चांदण्यानी भरले पुन्हा नव्याने
आयुष्य तारकांना उरले पुन्हा नव्याने
वर्षातला दुरावा, मी,तू विरून गेला.
प्रेमात शुध्द नाते हसले पुन्हा नव्याने
पंखातल्या बळावर मी झेप घेतली पण
झेपेत त्राण नव्हते कळले पुन्हा नव्याने
क्षण एक तो सुगंधी गेलास तू करुनी
विरहात राजसा मी झुरले पुन्हा नव्याने
स्वार्थात बोललेला नसतो खरा उखाणा
खोटे कळून सुद्धा वरले पुन्हा नव्याने
प्रा. सौ. मानसी मोहन जोशी
ठाणे (प.)
गझलकारा मानसीजी जोशी यांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments