Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

गुच्छ गुलाबी झाडांचा Gazalkara Dipali Vaze

 🌸 गझल प्रभात 🌸

🌿 वसंत विशेष 🌱



🌷गुच्छ गुलाबी झाडांचा.. 🌷


हाती लागत नाही कोणा गुच्छ गुलाबी झाडांचा

पण पायाशी चिरघळतो हा गुच्छ गुलाबी झाडांचा.. 


गाव फुलांनी सजले आणि रंग नव्याने अवतरले

लखलखला हा फांदीवरचा गुच्छ गुलाबी झाडांचा..


हिरवी पाने मौन पाळती क्षणभरच्या या जगण्यावर

सडा सांगतो मातीवरचा गुच्छ गुलाबी झाडांचा..


पथिकांचे मन मोहरतो अन् खिन्न मनाला सावरतो

करे प्रफुल्लित मार्गाला हा गुच्छ गुलाबी झाडांचा.. 


काय कुणाचे नाद तयाला, वाऱ्यासंगी भिरभिरतो

तुरा शोभतो हिरवाईचा गुच्छ गुलाबी झाडांचा.. 




सौ. दिपाली महेश वझे

बेंगळूरू

मो. 9714393969




Post a Comment

0 Comments