Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

तू सांग आयुष्या Gazalkara Mrunal Gite

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹




🌷तू सांग आयुष्या🌷


असा मी कोणता निश्चय करू तू सांग आयुष्या

कसे माझे मला मी सावरू तू सांग आयुष्या


कशासाठी अडकला प्राण या देहात म्हणते मी

कधी उडणार आता पाखरू तू सांग आयुष्या


कुणाचा देव जातीचा कुणाचा देव मातीचा

कुण्या देवास आता मी स्मरू तू सांग आयुष्या


मनाच्या खोल गाभारी दडवल्या खूप मी जखमा

चिघळल्यावर कशा त्या निस्तरू तू सांग आयुष्या


उडाली पाखरे सारी स्वतःच्या  दूर आकाशी

कुणाचा हात हाताशी धरू तू सांग आयुष्या


कुणी नाही, कुठे माझे, कुणाला काय सांगू मी

कथा माझ्या कशा मी उस्तरू तू सांग आयुष्या


कुडी सोडायची आता निघाले दूरच्या देशी

कसा सारा पसारा आवरू तू सांग आयुष्या


सौ. मृणाल सुनिल गिते


 गझलकारा मृणालजी गिते यांना वाढदिवसाच्या

मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments