Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

दवा Gazalkar Ashok Wadkar

 🍁 गझल प्रभात 🍁

☘️ वसंत विशेष 🍀


🪻दवा 🪻


फुलांचा ऋतू हा गारव्याची दवा

तुझे आज येणे हार्दिकाची दवा


तुझ्या आगमाने बहरला ऋतू हा

दरवळो सदा तो, काळजाची दवा


चंद्र पेरतो या रम्य चांदण्याला

मने भारलेली, चंदनाची दवा


सदा रमुन जावे, छंदात धुंद व्हावे

तीच लाभे मला विसाव्याची दवा


सृजन कार्य म्हणजे पर्वणी सुखाची

जन्मात लाभली...निसर्गाची दवा




अशोक म. वाडकर

कोल्हापूर

Post a Comment

0 Comments