● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
जीवना तू बांधली जी गाठ माझी..
जीवना तू बांधली जी गाठ माझी,
चालतो आहे अजूनी वाट माझी ....
प्रश्न हा नव्हता कधी माझ्यासमोरी,
दु:ख का सोडीत नाही पाठ माझी ....
फोमची गादी तुम्हां लखलाभ होवो,
चांगली आहे निजेला खाट माझी ....
का लळा हा लागला माझाच त्यांना,
आजही घेतात दु:खे गाठ माझी ....
नियम तोडा आज भरती ओहटीचे,
थोपवा आता तरी हो लाट माझी ....
दिवाकर चौकेकर
गझलकार दिवाकरजी चौकेकर यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments