Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

मला वाटले मी फुलासारखी Gazalkara Nandini Kale

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



मला वाटले मी फुलासारखी


कुठे मागते मी तुझे तेज सुर्या नको भव्यताही  नभासारखी

जराशीच संधी मलाही मिळू दे प्रकाशेन मीही दिव्यासारखी


दवातील थेंबात सामर्थ्य मोठे तृषा भागते ती धरेची सदा

बनव थेंब छोटा मला तू असा मग नको लाट ती सागरासारखी


झुगारून द्यावे खुळ्या बंधनाना उगा खीळ घालायची लक्षणे

कराव्यात पुरत्या मनातील इच्छा म्हणुन वागते मी मनासारखी


कसे पांग फेडू तुझे सांग आई मिळाले न कोणी तुझ्यासम कधी

अतोनात ममता पित्याचीच होती कुठे ऊब नसते घरासारखी


जरी होतसे पार निर्माल्य माझे खरे सौख्य त्यातच मला लाभते

सुगंधित झाले तुझे हात जेंव्हा मला वाटले मी फुलासारखी


नंदिनी काळे


 गझलकारा नंदिनीजी काळे यांना वाढदिवसाच्या

मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments