● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
अस्तित्वाच्या अस्तित्वावर अस्तित्वाची अस्तित्वे
ऐकवतो मी ज्योतिषराजा, हृदयामधला रडका स्वर
तळहाताच्या रेषांवरती, चालत नाही माझे घर
येते अर्भक जन्माला जर, नवसाने हे शिवशंकर
शुक्राणूला अन डिंबाला, जाऊ दे तू सुट्टीवर
अस्तित्वाच्या अस्तित्वावर, अस्तित्वाची अस्तित्वे
कोणी असतो उंदिर येथे, कोणी अजगर ताकदवर
मित्रांसाठी मधुशय्या मी, गद्दारांसाठी खंजर
तू प्रेमाच्या शेतीसाठी, चालव माझ्यावर नांगर
ते मखमलचे आसन दे तू, कुठल्याही बेडूकाला
पण त्याला सुखदायक वाटे, नाला अन जमिनीचा चर
मुंग्या अलगद राणीसाठी, झिजल्या आणिक मेल्याही
जगण्यास्तव जीवन कवकाने, केला इतरांचा वापर
मी का या दुनियेला माझे, हे व्रण जखमांचे दावू
ही दुनिया तर आली नव्हती, माराया त्यावर फुंकर
पाण्यासाठी निघतो आहे, का तुमचा घागरमोर्चा
टपकत असतो नळ नुसता तो, भरल्यानंतरही घागर
माझ्या एकाकीपणावरी, हसणार्यांनो सांगावे
जळतो का कोणी कोणाच्या, प्रेतासोबत सरणावर
हसतो एकामेकांवरती, आपण जीवन जगताना
जीवन हे मज सर्कस वाटे, आपण सगळेजण जोकर
डॉ. पवन कोरडे
गझलकार डॉ. पवनजी कोरडे यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments