● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷मी तुझ्या श्वासात आहे🌷
शोधले बाहेर ज्याला तो खरेतर आत आहे
देव शोधू मी कशाला नेहमी हृदयात आहे
प्रेम केल्याचा पुरावा पाहिजे ? मिळणार नाही
बंद कर तू प्रश्न सारे मी तुझ्या श्वासात आहे
तो किती निर्मळ मनाने बोलतो साऱ्या जगाशी
चांगल्याला चांगले म्हणणे अजुन रक्तात आहे
सांजवेळी पापण्यांचे दार जेव्हा बंद झाले
त्याक्षणी कळले मनाला मृत्यु या दारात आहे
ऐकतो आपण जगाचे पण कुणाला कदर नाही
ऐकण्याची गरज नव्हती बातमी जोरात आहे
कान भरणारे तुला मिळतील येथे खूप सारे
टाळ तू या माणसांना हे तुझ्या हातात आहे
नेहमी, ते टाळती कित्येक मुद्दे भांडणाचे
एक मुद्दा अटळ असतो नाव त्याचे जात आहे
भाकरीचा एक तुकडा पाहिल्यावर हासला तो
फक्त पाणी चार दिवसांपासुनी पोटात आहे
सुप्रिया पुरोहित हळबे
गझलकारा सुप्रियाजी पुरोहित हळबे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments