● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷मनापासून....!🌷
कुणी हसवून केल्या तर कुणी रडवून जखमा
मला केले जवळ आधी दिल्या जवळून जखमा
कुणाशी प्रेम नसल्याने कुणाशी वैर नव्हते
तरीही भेटल्या काही मनापासून जखमा
कधी दुर्लक्ष झालेले.. कधी विसरून गेलो
मनाला आठवण देतात मग ठणकून जखमा
सुगंधी व्हायचे होते तरी निवडुंग झालो
कदाचित द्यायच्या होत्या तुला परतून जखमा
नव्या काही जुन्या काही जमा होऊन आल्या
निघाल्या चार खांद्यावर मला घेऊन जखमा
नितीन गडवे
नाशिक
गझलकार नितीनजी गडवे यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments