● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷वाटा🌷
मीही तयार होतो, तीही तयार होती
अमुची विभागणीही मग जातवार होती
उचलून बालकाला फिरली करीत कामे
ती आज वृध्द आई जागेस भार होती
त्यांनाच बोललो मी ज्यांना नसे कणाही
पण त्याच शेपट्यांचे मजवर प्रहार होती
नितिमूल्य शिक्षणाने बेकार थांबले ते
रंगेल अंगठ्यांच्या नशिबात कार होती
ऐसे म्हणू नका की उपयोग काय अमुचा ?
पूर्तीत रामसेतू मदतीस खार होती
हेमंत डांगे
गझलकार हेमंतजी डांगे यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments