● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷गजऱ्यात अर्थ आहे🌷
बोलू कशास सारे मौनात अर्थ आहे
हृदयात जागणाऱ्या भावात अर्थ आहे
वचने दिलीस तू ती मोजू उगा कशाला
समजून पाळलेल्या शब्दात अर्थ आहे
सांगायला जगाला आहेत खूप नाती
माझ्यातुझ्या बहरल्या नात्यात अर्थ आहे
ना हाव ठेवली मी सन्मान सोहळ्यांची
तू काल माळलेल्या गजऱ्यात अर्थ आहे
आल्या भरास येथे गझला किती ढिगांनी
रसिकास भावलेल्या शेरात अर्थ आहे
अर्चना देवधर
रत्नागिरी
गझलकारा अर्चनाजी देवधर यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments