● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷नाही पटली माझी मलाच जोडी🌷
देणी, उधार बाकी पण सोडतो न घोडी
माझी मलाच केव्हा वाटेल लाज थोडी
मी बोललोच नाही खोटे कधी कुणाला
येणार मग कशी रे या कारल्यात गोडी
मी गुरफटून गेलो स्वार्थात एवढा की,
नाती फरार झाली; संबंध प्राण सोडी
दररोज ही त्सुनामी दुःखास सागराच्या
बुडले जहाज जेथे तरणार काय होडी?
मी ही नसायचो त्या लाचार बैठकीला..
नाही कधीच पटली माझी मलाच जोडी
विनोद देवरकर
गझलकार विनोदजी देवरकर यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments