● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷मला जमले न एकांतात लिहिणे 🌷
असे वेड्या प्रमाणे गात लिहिणे
कसे जमते तुला वृत्तात लिहिणे?
रकाना तेवढा काढून टाका...
जिवावर फार येते "जात" लिहिणे
कदाचित यामुळे सुचतात ओळी
असावे आपल्या नशिबात लिहिणे
अशा लिहिण्यास वेडेपण म्हणावे
ठळक गोष्टी पुन्हा कंसात लिहिणे
कवीला ही सवय उत्तम बनवते
कवीने आपल्या विश्वात लिहिणे
अवस्था होत जाते मेंढरागत...
सुरू जर ठेवले कळपात लिहिणे
प्रणय इतका तरल असतो जसा की
हवीशी ओळ अंधारात लिहिणे
खयालांच्या सतत गर्दीत असतो
मला जमले न एकांतात लिहिणे
हिरालाल बागुल 'श्रीदासुत'
गझलकार हिरालालजी बागुल यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments