● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷 वाहतो आहे 🌷
तुझा संकोच आताशा उजागर वाहतो आहे
तुझ्या देहातला वारा, अनावर वाहतो आहे
कधी हातामधे त्याने क्षणांना ठेवले नाही
युगाला घेउनी येथे कलंदर वाहतो आहे
कधी मी ' थांबला तो संपला ' हे ऐकले होते
नि तेव्हापासुनी मीही निरंतर वाहतो आहे
कधी कुठल्याच गोष्टींचा जमेना शॉर्टकट मजला
समस्या हीच माझी, मी सविस्तर वाहतो आहे
तुझी दुःखे, सुखे सारी, तुझी आशा, निराशाही
तुझे घेऊन मी सारेच दप्तर वाहतो आहे
खुलासे वेधशाळेचे कधी ना लावले तोंडी
अता माझ्यात मी घेऊन अंबर वाहतो आहे.
रूपेश देशमुख.
गझलकार रूपेशजी देशमुख यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments