● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷परवा परवा🌷
गाव किती हे सुंदर होते परवा परवा
जणू सुगंधी अत्तर होते परवा परवा
प्रत्येकाने भींती केल्या उभ्या भोवती
मनात कोठे अंतर होते परवा परवा
विचारधारा डळमळली का गावाची या
गाव तसे तर कट्टर होते परवा परवा
सरासरी सत्तरची सुद्धा नाही आता
वय आजीचे शंभर होते परवा परवा
किती वाढला गुंता आता सभोवताली
हर प्रश्नाला उत्तर होते परवा परवा
कुठे हरवले प्रेमाचे ते गाव अताशा
इथेच कोठे शेखर होते परवा परवा
शेखर गिरी
गझलकार शेखरजी गिरी यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments