● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌸 कसा मी स्विकारू🌸
कसा मी स्विकारू जिथे हात नाही
कधी काय झाले मला ज्ञात नाही
जिथे माणसाची कदर ना कुणाला
अशा मी ठिकाणी कधी जात नाही
जरी रंग काळा दिसायास माझा
तसा घातकी मी स्वभावात नाही
जसा खेळ खेळायचा खेळ तू पण
खरे तर तुझा डाव नियमात नाही
नको पाजळू तू तुझी संपदा ही
प्रकाशात आलो तिमीरात नाही
जरी हा ढिगारा धनाचा महाली
विवेकीपणा हा विचारात नाही
जरी मान नाही इथे मोगऱ्याला
सुगंधीपणा हा गुलाबात नाही
विजय भगत
चंद्रपूर
मो. ७९७२७३३२७५
गझलकार विजयजी भगत यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments