Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

निघालो आजही अंधार तुडवत Gazalkar Satish Malve

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



🌷निघालो आजही अंधार तुडवत🌷


तसेही मन कुठे नव्हतेच लागत

म्हणुन बसलोय छायागीत ऐकत


जसा दिसला समीक्षेचा कवडसा

खयालांची दशा झाली धुक्यागत


तुझ्या छायेत जगणे शक्य नाही

तुझा हेतू दिसत आहे उन्हागत 


जरी काट्यातले घरदार माझे

मला सांभाळले जाते फुलागत


कसा जगणार या चिखलामधे मी

कमळ सुद्धा मला नाही विचारत


स्वतःची  चव  इथे गेली तरीही....

समजतो का स्वतःला मी मिठागत?


तुला घेऊन सूर्या सोबतीला

निघालो आजही अंधार तुडवत


सतिश गुलाबसिंह मालवे




 गझलकार सतिशजी मालवे यांना वाढदिवसाच्या

मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments