● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌹मी वागलो वादळासारखा🌹
लाऊ नको ना लळासारखा
डोळ्यातल्या काजळासारखा
नुसती तिची याद आली तरी
दाटून येतो गळासारखा
तरबेज डोळे शिकारी तिचे
ती लावते सापळासारखा
झाल्यावरी ही डिजीटल पिढी
रडतो खडू अन् फळासारखा
लाथाड ओलांड तुडवून जा
मी लांघल्या तांदळासारखा
मी राधिका ना मिरा गोपिका
का? छेडतो सावळासारखा
नादात झालो निकामी तिच्या
मी पावल्या नारळासारखा
नाही मिळाला किनारा मला
मी वागलो वादळासारखा
शरद धनगर
मो. 8600161600
गझलकार शरदजी धनगर यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments