गझल प्रभात
🌹 भीमराया 🌹
जातीयता इथे ही तू जाळ भीमराया
पुन्हा इथे नव्याने सांभाळ भीमराया
आली मशागतीला येथे जमीन आता
हे शेत नांगराया हो फाळ भीमराया
पाण्याविना किती तू व्याकूळ होतं होता
तू भोगलास आहे तो काळ भीमराया
हे संविधान आम्हा गीता कुराण गाथा
तू वंचितास झाला आभाळ भीमराया
व्हा संघटित सारे आधी शिका परंतू
संघर्ष फक्त शिकले हे बाळ भीमराया
तू गर्व आमचा नी आहे अमोल ठेवा
तुझ्यात गुंतलेली ही नाळ भीमराया
देवका देशमुख
अकोला
0 Comments