● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷 वेळ नाही 🌷
वेदने आता तुझ्याशी बोलण्याला वेळ नाही
टाचले आहे किती मी मोजण्याला वेळ नाही
फार थोडे लाभले क्षण जीवनाशी हासणारे
आज गप्पा मारतो चल झोपण्याला वेळ नाही
ताल इतका छान जमला रात्र अपुरी वाटते बघ
फार उर्मी जागली पण नाचण्याला वेळ नाही
टाळले ठरवून तेंव्हा खास बोलावून सुद्धा
आज का मग एवढाही टाळण्याला वेळ नाही
पूर आलेला किती अन् नाव माझी मध्यभागी
जो हवा होता किनारा गाठण्याला वेळ नाही
यशवंत हिराबाई त्र्यंबक पगारे
बदलापूर
मो. ९८९२३३३६८३
गझलकार यशवंतजी पगारे यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments