Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

निर्धार Gazalkara Suvarna Mulajkar

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



🌷 निर्धार 🌷


प्राणात प्राण तोवर मी झुंजणार आहे

येवो प्रलय कितीही मी पोहणार आहे


पंखांस आजमावे माझ्या उनाड वारा 

त्या वादळास सहजी मी भेदणार आहे


गेले प्रयत्न वाया आलीच क्षीणताही 

स्फुल्लिंग चेतलेले मी ठेवणार आहे


होती विनम्र प्रज्ञा संघर्ष झेलताना

अन्याय मात्र आता मी रोखणार आहे


उमलो फुले स्तुतीची अन् रास कौतुकाची

शब्दांत प्रेम आता मी  पेरणार आहे


सौ. सुवर्णा व्यंकट मुळजकर

परभणी


 गझलकारा सुवर्णाजी मुळजकर यांना

 वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.. 

🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments