● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷चिंता नाही करत बुडबुडा अस्तित्वाची
चिंता नाही करत बुडबुडा अस्तित्वाची
अमर कुणीही नाही, खात्री आहे त्याची
अपंग करतो शिखर लीलया सर जिद्दीने
अव्यंगांना चिंता पडते गंतव्याची
परिस्थितीवर तुला पहारा ठेवायाचा
उंच पाहिजे अजून निर्धाराची माची
सिद्धीची तू सोड काळजी भगवंतावर
फक्त काळजी तुझ्या सतत घे संकल्पाची
सत्य ढळढळित असूनही ना दिसते त्याला
डोळ्यांवरती असते झापड सतत भ्रमाची
कफनी धारण केल्याने का फकीर होतो
टिंगल करते दुनिया असल्या वैराग्याची
वसंत आल्यावरती कोकिळ कूजन करतो
कुठे लागते त्यास शिकवणी गंधर्वाची
स्मिता गोरंटीवार
वणी
गझलकारा स्मिताजी गोरंटीवार यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments