● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷 नाही 🌷
हल्ली माझ्या ह्या कवितांना लाइक नाही, कमेंट नाही;
समतावादी माणुसकीला लाइक नाही, कमेंट नाही.
ज्यांना आम्ही मोठे केले त्यांनीच दिला धोका आता;
इतरांसाठी जगणा-याला लाइक नाही, कमेंट नाही.
शोषित, पीडित जनतेसाठी युध्द करतात अंधाराशी;
प्रकाश उधळत विझणा-यांना लाइक नाही, कमेंट नाही.
शेतक-याचे जीवन म्हणजे गोड विषाच्या नदीत बुडणे;
दुनियेकरिता बुडणा-याला लाइक नाही, कमेंट नाही.
देवांसाठी, धर्मांसाठी खून करतात माणुसकीचा;
माणुसकीस्तव लढणा-यांना लाइक नाही, कमेंट नाही.
मिलिंद देविदास हिवराळे
सादिक नगर, मु.पो.ता. बार्शिटाकळी,
जि. अकोला - 444401 (म. रा.)
भ्र. 7507094882
गझलकार मिलिंदजी हिवराळे यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments