Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

भाकरी पाहुन मला माघार घ्यावी लागते Gazalkar Attam Gende

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



🌷भाकरी पाहुन मला माघार घ्यावी लागते🌷


दूर जाताना तुला तर ठेच साधी लागते 

काळजाला बघ किती माझ्या *जिभाळी लागते 


गोष्ट छोटीशीच आहे पण जिव्हारी लागते 

न्याय देण्याची विनंती का करावी लागते?


सिद्ध नाही व्हायची ईमानदारी आमची....

पात्रता फेरीत सुद्धा लाच द्यावी लागते...!


बातम्यांवर तेवढा विश्वास नाही राहिला...

त्यामुळे मिडियात अफवा पसरवावी लागते 


काय सांगू काय पिकते कोरड्या शेतामधे 

कापसाला आमच्या केवळ पर्‍हाटी लागते 


झोपड्या जाग्याच येथे काळजीने रात्रभर 

बंगल्यांना झोप तेथे भर दुपारी लागते 


घेतली जातेय शंका आमच्या जातीमुळे 

देशभक्ती सिद्ध करुनी दाखवावी लागते 


कासवाची अन सशाची गोष्ट मी शिकलोय पण 

भाकरी पाहुन मला माघार घ्यावी लागते..


आत्तम गेंदे 


*जिभाळी - नखाखालच्या नाजूक भागाला झालेली दुखापत


 गझलकार आत्तमजी गेंदे यांना वाढदिवसाच्या

मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments