● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷जरा समजून पाहू🌷
उभ्या देहातल्या जखमा जरा उघडून पाहू
मनाचे दुःख वेशीवर, असे टांगून पाहू..!
जिथे आवाज थांबावे, तिथे स्पर्शांत बोलू
मनाच्या त्या किनाऱ्यावर जरा धावून पाहू..!
बहुत अंतर पुढे गाठायचे आहे परंतू
जिथे थांबायचे नव्हते, तिथे थांबून पाहू..!
नभी दाटून आलेल्या मनाच्या शांततेला
कवडसा एक आशेचा पुढे ठेवून पाहू..!
जिथे खोलात गेल्यावर उमगते मौन सारे
तिथे सावधपणे सारे जरा समजून पाहू..!
अपर्णा नैताम
गझलकारा अपर्णाजी नैताम यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments