Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

चर्चा Gazalkar Nishant Pawar

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



🌷 चर्चा 🌷


वादळात सापडली चर्चा 

दिशाहीन भरकटली चर्चा 


सुरूवात तर उमदी होती 

पुढे पुढे ढासळली चर्चा 


कोणालाही कळले नाही

कुठे नेमकी अडली चर्चा 


पडद्यासमोर नाटक घडले 

पडद्यामागे घडली चर्चा 


नवीन मुद्दा समोर आला 

एक जुनी आठवली चर्चा 


फार वेगळे वळण लागले 

म्हणून तर आवरली चर्चा 


विचारमंथन करतो आहे 

का वांझोटी ठरली चर्चा !


निशांत पवार


 गझलकार निशांतजी पवार यांना वाढदिवसाच्या

मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments