● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷माझ्या मधली मुलगी🌷
पिच्छा माझा सोडत नाही माझ्या मधली मुलगी
बालपणाला रोखत नाही माझ्या मधली मुलगी
मिटक्या मारत मिसळीवरती ताव मारते कायम
पथ्य कोणते पाळत नाही माझ्या मधली मुलगी
पोर परकरी उड्या मारते तशीच धावत सुटते
मर्यादांना मानत नाही माझ्या मधली मुलगी
अवघडलेल्या सांध्यांनीही ताल पकडते तथ्था
नाचनाचते थांबत नाही माझ्या मधली मुलगी
कुण्या भितीने तिचे थांबले स्वप्न पाहणे सुंदर
हट्टासाठी पेटत नाही माझ्या मधली मुलगी
नक्की काही लपवत असते खोटी हसते वरवर
उगाच आसू ढाळत नाही माझ्या मधली मुलगी
बिचकत असते दचकत असते खुट्ट वाजता थोडे
का धैर्याने वागत नाही माझ्या मधली मुलगी
अर्चना मुरुगकर
तळेगाव दाभाडे
गझलकारा अर्चनाजी मुरुगकर यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
0 Comments