🟣 नवरात्र विशेष 🟣
🌸 चौथी माळ 🌸
🌼 आजचा रंग:- पिवळा 🌼
🌷वादळ🌷
मी बेसावध असताना येऊन धडकले वादळ
अन् समजावून थकल्यावर हलकेच सरकले वादळ
जा सोड मनाची जागा मी म्हटले ते ओसरले
पण नाव तुझे दिसल्यावर भलतेच भडकले वादळ
जर फसव्या होत्या हाका हृदयात उमाळे नव्हते
कोणाच्या शब्दावरती हे सांग थिरकले वादळ
फितवून ऋतूंना साऱ्या मज भुरळ घातली त्याने
काळीज वितळण्याआधी पण मीच झटकले वादळ
या आयुष्याच्या पदरी त्यालाही बांधू म्हटले
माझ्यात फुलांचा तांडा पाहून दचकले वादळ
हळवे नि गुलाबी झाले अन् आवेगाने आले
मी फक्त म्हणाले नाही तेथेच थबकले वादळ
चल उधळू- सांडू- तोडू हा होता त्याचा हेका
गहिवरली फुंकर माझी तेथेच अडकले वादळ
राधा भावे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments