🟣 नवरात्र विशेष 🟣
🌸 पाचवी माळ 🌸
🍀 आजचा रंग:- हिरवा 🍀
🌷माझ्या घरी आली🌷
दिले सोडून घर, अंगण तुझे, माझ्या घरी आली,
दिला मी आसरा जेव्हा उन्हे माझ्या घरी आली....
तुझे तर नावही साधे कधी मी घेतले नव्हते,
तरी पत्ता तुझा शोधत,सुखे माझ्या घरी आली...
जरी प्राजक्त वाढवला तिच्या तू अंगणामध्ये,
विचारत उंबरा माझा फुले माझ्या घरी आली...
ढगांची पाठ फिरली अन् हरवली ओल मातीची,
झरा डोळ्यात दिसल्यावर मुळे माझ्या घरी आली...
कितीही मारल्या हाका तरी फिरकत नसे कोणी,
शितांचा वास आल्यावर भुते माझ्या घरी आली...
तुझ्यापर्यंत व्याकुळ शब्द माझे पोचले बहुधा,
तुझी हळवी नजर तेव्हा कुठे माझ्या घरी आली...
जसा मी लावला ओठांस पावा सांजवेळेला,
विसरली वाट घरची अन् गुरे माझ्या घरी आली...
माधुरी चव्हाण जोशी
देवगड
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments