🟣 नवरात्र विशेष 🟣
🌸 तिसरी माळ 🌸
🔵 आजचा रंग:- निळा 🔵
🌷कविता जेव्हा भोळ्या होत्या🌷
कविता जेव्हा भोळ्या होत्या
भरुन वाहत्या झोळ्या होत्या
कुतूहलाचा अवखळ निर्झर
डोळ्यांच्या मासोळ्या होत्या
डोक्यावरले छप्पर गळके
हातांच्या पागोळ्या होत्या
नव्यास जागा देउन गेल्या
सरपणास ज्या मोळ्या होत्या
सुरकुतलेल्या पदराखाली
वात्सल्याच्या चोळ्या होत्या
जंगल मक्तेदारी नव्हती
हरणांच्याही टोळ्या होत्या ...
सुनिता रामचंद्र
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments