🟣 नवरात्र विशेष 🟣
🌸 सहावी माळ 🌸
🌼 आजचा रंग:- राखाडी 🌼
🌷पाखरे यायची त्याच्या उबेला🌷
पाखरे दररोज रात्री यायची त्याच्या उबेला
एक मोठे झाड होते या इथे रस्त्याकडेला
काल त्या वेड्या उन्हाने काहिली केली मनाची
आज हा पाऊस सुद्धा पेटला आहे इरेला
सारखी घेतेय बाजू वाटले असते कुणाला
एवढ्यासाठीच नाही मी तुझा उल्लेख केला
पात्र आहे खोल तेथे भोवरे आहेत काही
देखणा आहे किनारा जीवनाच्या भीवरेला
मी वजा केले स्वतःला आजवर प्रत्येक वेळी
एकदासुद्धा मला तू घेतले नाही जमेला
त्यामुळे केव्हाच तेथे शब्द नाही टाकला मी
चांगला असतो स्वतःचा मान आपण राखलेला
काय आहे त्यापुढे चल एकदा जाऊन पाहू
ते निळे आकाश जेथे टेकले आहे धरेला
मध्यभागी मी उभी आहे जणू बेटाप्रमाणे
अन् विचारांनी मला चौफेर वेढा घातलेला
अल्पना देशमुख-नायक
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments