🟣 नवरात्र विशेष 🟣
🌸 सातवी माळ 🌸
🌼 आजचा रंग:- नारंगी 🌼
🌷आहे का?🌷
सुगंधी राबता व्हावा असा सहभाग आहे का?
लिपीमध्ये, मिठीमध्ये तुझ्या फुलबाग आहे का?
निखाऱ्याला फुलायाला उमाळ्याची जशी फुंकर
तशी उत्कट जिव्हाळ्याची पुरेशी आग आहे का?
जगाला माहिती झाले तुला माहीतही नाही
तुझ्या रागात सहभागी छुपा अनुराग आहे का?
तुझ्या ताटात खाणारा तुझ्या पाटासही डसला
कुणी जिवलग सखा इतका भयानक नाग आहे का?
तुला छापा हवा आहे, नको काटा मुळीसुद्धा
जगायाला हवी नाणी अटळ हा भाग आहे...का ?
दगड जर मारला आहे मनाच्या शांत पोळ्यावर
स्वतःचे डंख विद्रोही तसा वैताग आहे का?
मुभा आहे तुझ्या हाती, निघावी धिंड की दिंडी?
भल्यासाठी, लढ्यासाठी विवेकी जाग आहे का?
विजया टाळकुटे
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments