Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

समजून घे! Gazalkara Anita Bodke

 🟣 नवरात्र विशेष 🟣

🌸 आठवी माळ 🌸

🌼 आजचा रंग:- मोरपंखी 🌼



 🌷समजून घे!🌷


जीव होतो एवढा का घाबरा समजून घे!

हे तुझे आभाळ नाही पाखरा समजून घे!


ओढ देतो पावसा तू पेरणी केल्यावरी

मी कितीदा लपवलेला कासरा समजून घे!


मी कसे नात्यास देवू नाव वेड्या आपल्या

मानते हळवा तुला मी कोपरा समजून घे!


मी कसा होकार देवू सांगना शब्दामधे

मी उगा ना माळला हा मोगरा समजून घे!


मग बघू तुटते कसे नाते तुझ्या माझ्यातले

मी जरा समजून घेते, तू जरा समजून घे!


चार आणे टाकतो अन मागतो सारी सुखे

जात स्वार्थी माणसाची ईश्वरा समजून घे!


अनिता बोडके


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments