🟣 नवरात्र विशेष 🟣
🌸 नववी माळ 🌸
🌼 आजचा रंग:- गुलाबी 🌼
🌷द्या पांढरा घोडा मला🌷
स्वप्न अर्धे थांबवा अन् वेळ द्या थोडा मला
राजपुत्राऐवजी द्या पांढरा घोडा मला
वेध घेइन रावणाचा.. मी हरिण आणेनही
लक्ष्मणाची रेष बुजवा एकटे सोडा मला
झाकणे ईप्सित खरे पण साध्य झाले तर बरे
विरविरित मी वस्त्र.. अस्तर जाडसर जोडा मला
ओळ एखादी पुढे येईल ज्ञानासारखी
होत नाही मान्य मी तोवर तुम्ही खोडा मला
वर मला आहे मिळाला पूर्णता व्यापायचा
मी 'दिशा' जुळते पुन्हा फोडा मला तोडा मला
दिशा
डॉ. स्नेहल कुलकर्णी
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments