Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

तू हात जरासा हाती घेता Gazalkara Mamta Sindhutai Sapkal

 🟣 नवरात्र विशेष 🟣

🌼 पहिली माळ 🌼

🌞 आजचा रंग:- पांढरा 🌞




 🌷तू हात जरासा हाती घेता🌷


येऊन थांबते ऊन जसे दाराशी..

मी तुला इमॅजिन करते माझ्यापाशी.!


तू हात जरासा हाती घेता माझा..

लोळण घेतील सुखे माझ्या पायाशी.!


काढले हवे ते अर्थ म्हणे सगळ्यांनी

बोलून बघूया आज पुन्हा सगळ्यांशी.!


जाळ्यावर कसली घेतो आहे शंका

लागणार नसतो मासा रोज गळाशी.!


तू दूर दूर जातोस तरीही मी बघ

कवटाळते तुला रोज रोज ह्रदयाशी.!


इतकी माणुसघाणीही नव्हते मी पण

जन्मभर तरी जमले नाहीच कुणाशी.!


मग जसा आटला पाझर माझ्यामधला

तू घाव घातलेला तेंव्हाच मुळाशी.!


नश्वर देहाने विनाश केला सारा..

पण देहामधला आत्मा तर अविनाशी.!


-ममता सिंधुताई सपकाळ.



=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=











Post a Comment

0 Comments