● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷 इच्छा 🌷
मी पाळल्यात इच्छा, सांभाळल्यात इच्छा
होत्या अवाजवी ज्या त्या गाळल्यात इच्छा
बांधून ठेवलेल्या मी दावणीस काही
उंडारुनी मनातच ढेपाळल्यात इच्छा
कित्येक प्रश्न होते डोक्यात साठलेले
उत्तर कधी न मिळता चेकाळल्यात इच्छा
स्वप्नात पाहिलेले सत्यात येत नाही
पाहून वाट साऱ्या कंटाळल्यात इच्छा
आजार मत्सराचा उपचार त्यास नाही
शेजार निंदकाने हेटाळल्यात इच्छा
गर्भातल्या जिवाला वाली नसे कुणीही
पाहून भ्रूण कन्या चुरगाळल्यात इच्छा
दैवापुढे कुणाचा येथे निभाव नाही
मी राहिलो अभागी फेटाळल्यात इच्छा
आयुष्य क्षणभराचे जगलो फुलाप्रमाणे
येऊन शेवटाला गंधाळल्यात इच्छा
अरुण सावंत 'अशंसा'
गझलकार अरुणजी सावंत यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•

0 Comments