● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷वनवास पूर्ण लिहिला 🌷
माझ्या तुझ्या व्यथांचा इतिहास पूर्ण लिहिला
दुर्दैव हेच आहे वनवास पूर्ण लिहिला
शब्दात विश्व सारे होते लिहावयाचे
मी माय शब्द लिहिला अभ्यास पूर्ण लिहिला
वाचाळ लेखणीची मज कीव येत आहे
माझ्या भलेपणाचा उपहास पूर्ण लिहिला
तो वास्तवात नव्हता होता कपोलकल्पित
स्वप्नात पाहिलेला मधुमास पूर्ण लिहिला
ते पान आठवांचे लपवून ठेवले मी
आहे जुन्या वहीवर विश्वास पूर्ण लिहिला
कुमारेश
नारायण किसनराव सुरंदसे
धामणगाव रेल्वे
जि. अमरावती .
गझलकार नारायणजी सुरंदसे यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments