● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷कशी रोखू..🌷
पुन्हा देहात झालेली सुरू सळसळ कशी रोखू
अनाहत हा तुझा दरवळ, तुझी वर्दळ कशी रोखू
नभाच्या चांदण्यांशी ही लगट मी पाहिली चंद्रा
मनाच्या आत होणारी अता जळजळ कशी रोखू
कितीदा लावले आणिक कितीदा वाहिले काजळ
सजवले आर्त डोळे पण व्यथित ओघळ कशी रोखू
तुझ्या या चेहऱ्यावरची बघून ही वाटली शांती
मनाच्या आत असलेली तुझी खळबळ कशी रोखू
कवच अन कुंडले काढुन दिली इंद्रास तू अर्पण
अरे दिलदार कर्णा मी तुझी ओंजळ कशी रोखू
हेमलता पाटील
गझलकारा हेमलताजी पाटील यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments