● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷संपत नाही खैरात बापाची 🌷
संपतच नाही कधी खैरात बापाची
वेगळी असते जराशी जात बापाची
फाटलेली अंगवस्त्रे पाहतो तेंव्हा
दाटुनी येते छबी नयनात बापाची
खेळण्या साऱ्याच त्याच्या वाटल्या त्याला
लाभली जोवर मुलाला साथ बापाची
हट्ट पुरवुन दाव आधी पट्टराणीचे
तू कशाला काढतो औकात बापाची
काय असते दान हे समजेल रे तुजला
येउदे थोडी वयाला नात बापाची
आश्रमाला पाठवूनी मुल्य ममतेचे
आज पिल्ले काळजी घेतात बापाची
एवढेची मागणे मी मागतो देवा
मरण लाभावे तराणी गात बापाची
मारोती वाघमारे 'रणजित'
गझलकार मारोतीजी वाघमारे यांना वाढदिवसाच्या
मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=


0 Comments