Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

प्रतिक्षा Gazalkara Pallavi Umare

 ● गझल प्रभात ●   

🌹 वाढदिवस विशेष 🌹



 🌷प्रतिक्षा🌷


जगण्यात राम नाही उरली उगा प्रतिक्षा

 नियती उगाच छळते, जगणे कठोर शिक्षा


श्वासात त्राण नाही, तन आर्जवे सुखाला

शापीत मौन म्हणते घ्यावी अनाम दिक्षा


शोधून ना चुकांचे संदर्भ गवसले ते

झिरपून जन्म गेला उरली पुन्हा तितिक्षा


उद्धिष्ट गाठले अन, स्वप्ने गहाळ झाली

मी घालते गवसणी ढवळून अंतरिक्षा


समजून कोण घेतो इतक्यात वेदनेला

धुडकावले जगाने, मी मांडली समिक्षा


पल्लवी उमरे

मुंबई


 गझलकारा पल्लवीजी उमरे यांना वाढदिवसाच्या

मंगलमय शुभेच्छा.. 🌹🌹🌹🌹🌹


=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

संयोजक:- भरत माळी

मो. 9420168806

=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

Post a Comment

0 Comments