Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

जालना येथे रविवारी मराठवाडा विभागीय गझल संमेलन Marathwada Gazal sammelan


जालना येथे रविवारी मराठवाडा विभागीय गझल संमेलन



ज्येष्ठ गझलकार डॉ. संतोष कुलकर्णी अध्यक्षस्थानी; प्रफुल कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन


     जालना, दि. ८ (प्रतिनिधी) गझल मंथन साहित्य संस्था, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद जालना व अक्षर वैभव साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जालना येथे उद्या दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता मराठा सेवा संघाच्या सभागृहात मराठवाडा विभागीय एक दिवसीय गझल संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ गझलकार डॉ. संतोष कुलकर्णी भूषवणार असून, ज्येष्ठ गझलकार प्रफुल कुलकर्णी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

     या संमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून गझलकार आत्तम गेंदे, आत्माराम जाधव, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. शशिकांत पाटील उपस्थित राहतील. गझलकार डॉ. राज रणधीर हे स्वागताध्यक्ष आहेत. या संमेलनात गझल अमृत दिवाळी अंक व गझलयात्री-४ या प्रातिनिधिक गझलसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली दीक्षित करतील. तर प्रा. अनंत देशपांडे आभार मानतील. त्यानंतर दिवसभर महाराष्ट्रातील नामांकित गझलकारांचा गझल मुशायरा रंगणार आहे. या मुशायऱ्यांचे अध्यक्षपद गझलकार प्रफुल कुलकर्णी, रत्नाकर जोशी, स्नेहलता झरकर अंदुरे, दिशा चौसाळकर आदी भूषवतील. तर या मुशायऱ्यांचे सूत्रसंचालन शेखर गिरी, चंद्रकांत कदम, अविनाश कासांडे, आर. के. आठवले करतील. या संमेलनाला आमदार संतोष दानवे, भास्कर दानवे, डॉ. क्रांतीसिंह लाखे पाटील यांचे सहकार्य लाभणार आहे. समारोप समारंभाचे सूत्रसंचालन राजू आठवले तर आभार मानवी देवळाणकर मानतील. 

     सायंकाळी ६ वाजता गझलगायक संकेत नागपूरकर व गझलकार राज रणधीर यांची 'हृदयाची पिंपळपाने' ही मैफिल रंगणार आहे. सहगायिका मोहिनी रायबागकर यांची साथ लाभणार आहे. गझल रसिकांनी या संमेलनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, सचिव जयवंत वानखडे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, संयोजक डॉ. शिवाजी काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, डॉ. शशिकांत पाटील, मराठवाडा विभाग प्रमुख संजय तिडके, राजू आठवले, प्रा. अनंत देशपांडे, दिवाकर जोशी, राजेसाहेब कदम, संतोष मिसाळ, डॉ. राज रणधीर, प्रा. गोवर्धन मुळक, अंजली दीक्षित यांनी केले आहे.



Post a Comment

0 Comments