Advertisement

गझल मंथन संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे

सायंकाळच्या मंद प्रकाशात उलगडणार 'हृदयाची पिंपळपाने' Marathwada Gazal Sammelan

 सायंकाळच्या मंद प्रकाशात

 उलगडणार 'हृदयाची पिंपळपाने'



     जालना येथील मराठा सेवा संघाच्या सभागृहात रविवारी सायंकाळच्या मंद प्रकाशात 'हृदयाची पिंपळपाने' उलगडणार आहेत.. सुप्रसिद्ध गझलगायक संकेत नागपूरकर व सुप्रसिद्ध गझलकार डॉ. राज रणधीर हे तहत व तरन्नुमच्या माध्यमातून संगीत मैफलीत रंग भरणार आहेत.. सहगायिका मोहिनी रायबागकर यांची त्यांना साथसंगत लागणार आहे..

     गझल मंथन साहित्य संस्था, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद जालना व अक्षर वैभव साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

     कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पंचायती राज समितीचे प्रमुख आ. संतोष दानवे व भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला ओजस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संयोजक डॉ. क्रांतीसिंह लाखे पाटील यांचे सहकार्य लाभणार आहे

     या संगीत मैफलीचा गझल रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष वसुदेव गुमटकर, सचिव जयवंत वानखडे, उमा पाटील, प्रशांत रामगिरवार, अनुप रणदिवे, महेश गारघाटे, संयोजक व मार्गदर्शक डॉ. शिवाजी काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष शशिकांत पाटील, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संतोष मिसाळ, संमेलन समितीचे अध्यक्ष मुकुंदराव जाधव, समन्वयक प्रदीप तळेकर, मराठवाडा विभाग प्रमुख संजय तिडके, उपविभाग प्रमुख राजू आठवले, सचिव प्रा. अनंत देशपांडे, सहसचिव दिवाकर जोशी, कोषाध्यक्ष राजेसाहेब कदम, जालना जिल्हाध्यक्ष प्रा. गोवर्धन मुळक, गझलकारा अंजली दीक्षित, सदस्या  डॉ. शुभांगी कुलकर्णी, गणेश खरात, वैशाली फोके, वासुदेव उगले, अशोक खेडकर, स्वाती रत्नपारखी आदींनी केले आहे.

Post a Comment

0 Comments