● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷एवढे उपकार कर🌷
या पिढीचे हाल जाणुन एवढे उपकार कर
सात दिवसांतून अमुचा तीनदा रविवार कर
लोंबकळता राहिलेलो लंबकासम जन्मभर
हे प्रभो तू एकदाचे आर कर वा पार कर
घुटमळत थबकून सारी उंबऱ्यावरती सुखे
स्वागतासाठी घराला एक मोठे दार कर
कातडी गेंड्याप्रमाणे लाभली आहे मला
तू सुऱ्याला चरचरा कापेल इतकी धार कर
प्यायची इच्छा लगोलग पाहिजेतर पूर्ण कर
रक्त माझे उष्ण आहे फक्त थोडे गार कर
काळजाने काळजावर वार केला लाघवी
शुद्ध आल्यावर पुन्हा तू देखणा प्रतिवार कर
पेरलेल्या वेदनांचे पीक आले केवढे
भाव बाजारात आहे तोवरी व्यापार कर
प्रदीप तळेकर
गझलकार प्रदीपजी तळेकर यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments