● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷सोबतीला तू असावे🌷
आस उरली ना कशाची लागतो ना श्वास आहे
सोबतीला तू असावे एवढेही बास आहे
पापणी झुकवून खाली ही कळी खुलली अचानक
अंतरी कोणीतरी डोकावले हमखास आहे
चल करूया एकदा सुरवात नात्याची नव्याने
राग रुसवा सोड ना तो आपला इतिहास आहे
हा अबोला क्षणभराचा केवढा छळतो मलाही
वाटते की दोन क्षण आजन्म कारावास आहे
पाहिजे तर वाग आता तू तुझ्या मर्जीप्रमाणे
ना अपेक्षा राहिली मी घेतला संन्यास आहे
मनाली प्रदिप कोनकर
पेण रायगड
गझलकारा मनालीजी कोनकर यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments