● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷वेगळे सामान आले🌷
जन्म आल्यावर समेला जीवनाचे भान आले
लागता कैवल्य तंद्री भैरवीचे गान आले
चित्र केवळ चित्र असते काढता आले हवे ते
झाड, घरटे, दोन पक्षी, एक पिल्लू छान आले
जिंदगीचा बैंडबाजा ऐकताना एक झाले
गायकी शिकलो नसुनही गायकीचे कान आले
लावले त्यांनी कलम तर चांगले नात्यास होते
पारिजातक वाटला पण बाभळीचे पान आले
घोळ यादीतील त्याच्या चालला आहे निरंतर
मागणी होती निराळी वेगळे सामान आले
डॉ मंदार खरे
गझलकार डॉ मंदारजी खरे यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments