● गझल प्रभात ●
🌹 वाढदिवस विशेष 🌹
🌷हेच तर आहे गुपित माझ्या सुखांचे 🌷
सोहळे करतो व्यथा अन यातनांचे
हेच तर आहे गुपित माझ्या सुखांचे
फार हलके वाटले ती गाळल्यावर
केवढे होते वजन या आसवांचे !
चेतवुन तू का बघत आहेस गंमत
कोळसे होतात माझ्या भावनांचे
झोपडी पाडून पक्के घर बनवले
मी कसे उपकार विसरू वादळांचे !
एवढ्यावर पाखरे ती खूष होती
रंग दिधले फक्त बदलुन पिंजऱ्यांचे
आजही प्रत्यय कधी येतो असा की
माकडच पूर्वज असावे माणसांचे
काल ठिणगी वाटली उबदार ज्यांची
आज वणवे पेटले त्या वासनांचे
माकडाने फस्त केले सर्व लोणी
संपले तेव्हाच भांडण मांजरांचे
गाठता आली न उंची वास्तवाची
पंख फडफडले नि थकले कल्पनांचे
देव निर्माता असे या सृष्टिचा तर
वंश कोणी निर्मिले मग दानवांचे
चेहरे उलटेच आवडतात त्यांना
आरशांवर प्रेम जडले फार ज्यांचे
प्रा. सुभाष भि. मगर
गझलकार प्रा. सुभाषजी मगर यांना
वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा..
🌹🌹🌹🌹🌹
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=
संयोजक:- भरत माळी
मो. 9420168806
=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=•=

0 Comments